ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंचने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. रविवारी तो न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा वनडे सामना खेळणार आहे. ऑस्ट्रेलियन संघासाठी 145 वनडे खेळणारा आरोन फिंच या फॉरमॅटमध्ये खराब फॉर्मशी झुंजतो आहे. गेल्या सात डावांत त्याच्या बॅटमधून केवळ 26 धावा झाल्या आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, फिंचने सांगितले की, हा एक अद्भुत प्रवास होता
फिंच म्हणाला, “काही सर्वोत्तम एकदिवसीय संघांचा सदस्य म्हणून मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. यासोबतच त्याने सहकारी खेळाडू आणि सपोर्ट स्टाफचेही आभार मानले. यानंतर फिंच म्हणाला की, नवीन कर्णधाराला संधी देण्याची हीच वेळ आहे जेणेकरून तो पूर्ण तयारी करू शकेल आणि पुढील विश्वचषक जिंकू शकेल. या टप्प्यावर ज्यांनी मला मदत केली आणि पाठिंबा दिला त्या सर्वांचे मी आभार मानतो.
2024 मध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत फिंच संघाचे नेतृत्व करणार
नाही, परंतु या वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत तो कांगारू संघाचे नेतृत्व करेल. त्याने वनडेमध्ये 5400 धावा केल्या आहेत. त्यात 17 शतकांचाही समावेश आहे. त्याने २०१३ साली मेलबर्नच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध पदार्पण केले होते. त्याचवेळी स्कॉटलंडविरुद्ध पहिले शतक झळकावले. या सामन्यात त्याने 148 धावा केल्या.