अक्षय तृतीयेला असलं दान? पुण्य सोडा पापाचे भागीदारी व्हाल

सडलेले फळं किंवा शिळं अन्न
दान म्हणून उरलेलं अन्न, शिळं अन्न किंवा सडलेले फळ कधीही दान करू नये. दान अशा पदार्थांचे करावे जे आम्ही खातो...
 
जुने कपडे
लोकं दान करण्यासाठी अनेकदा जुने कपडे गरीब किंवा गरजू लोकांसाठी घेऊन जातात. हे चुकीचे आहे. या दिवशी दान करण्यासाठी नवीन कपडे खरेदी करावे.  
 
धारदार सामान
या दिवशी धारदार, काटेदार, टोक असणार्‍या वस्तूंचे दान करू नये. जीवनात दुर्भाग्य येतं आणि नात्यात कडवटपणा येतो.
 
झाडू
या दिवशी चुकून ही झाडू दान करू नये. याने घरात पैसा टिकत नाही.
 
अभ्यासाचे सामान
कॉपी, पुस्तक, धार्मिक ग्रंथ इतर दान करणे उत्तम ठरेल परंतू फाटक्या किंवा वाईट स्थितीत असलेले पुस्तक दान करू नये. याने आपल्या निर्णय घेण्याच्या शक्तीवर प्रभाव पडेल.
 
तेल
तेलाचे दान केल्याने शनी दोष दूर होतो आणि धनासंबंधी समस्या देखील दूर होतात. परंतू उरलेलं किंवा वापरलेलं तेल दान केल्याने पुण्य लागत नाही. आर्थिक समस्यांना सामोरा जावं लागतं.
 
प्लास्टिक सामान
प्लास्टिकच्या वस्तू दान करण्यामुळे प्रगती थांबते आणि व्यवसायावर देखील प्रभाव पडतो.
 
स्टील भांडी
स्टीलचे भांडे दान केल्याने घरातून आनंद हरवतो आणि नात्यात दुरावा निर्माण होतो.
 
आपण अक्षय तृतीयाच्या शुभ प्रसंगी अन्न, धान्य, कपडे दान करू शकता आणि प्याऊ देखील लावू शकता.
विशेष: दान करताना आपले मुख पूर्वीकडे तर दान घेणार्‍याचे मुख उत्तर दिशेकडे असावे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती