या दिवशी ब्रह्म मुहूर्तामध्ये उठून स्नानादि करुन श्री विष्णू आणि माँ लक्ष्मीच्या मूर्तीवर अक्षता अर्पित कराव्या. शांत मनाने पांढर्या कमळाची फुले किंवा पांढरे गुलाब, धूप-उदबत्ती, आणि चंदन इत्यादी सामुग्रीने पूजा करावी. गहू किंवा सत्तू, काकडी, हरभरा, याचं नैवेद्य दाखवावं. या दिवशी ब्राह्मणांना अन्न दान करुन त्यांचा आशीर्वाद प्राप्त करावं. तसेच या दिवशी फळं, भांडी, कपडे, गाय, जमीन, पाण्याने भरलेले घडे, पंखे, तांदूळ, मीठ, तूप, खरबूज, साखर, हिरव्या भाज्या इत्यादी दान करणे चांगले मानले जाते.
या व्यतिरिक्त या दिवशी दान देण्याचे अत्यंत महत्त्व आहे. या दिवशी शुभ संयोग आहे त्यामुळे वर्षभर दान न करणारे देखील या तिथी दान करून अक्षय फळ प्राप्त करू शकतात. या दिवशी देव, ऋषी, पितरांसाठी ब्रह्म यज्ञ, पिंड दान आणि अन्न दान करावे. या दिवशी पाण्याच मटके दान करावे. तसेच या तिथीला जव, गहू, सातू, तांदूळ, मातीचे मडके, फळ दान करणे शुभ ठरेल. या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून ब्राह्मणाला उदककुंभाचे दान करावे.
दान व्यतिरिक्त या दिवशी स्वत:साठी खरेदी करुन त्याची पूजा केल्याने देखील यश आणि भाग्य नेहमी साथ देतं. म्हणून या दिवशी लोक जमीन, जायदादसंबंधी किंवा शेअर मार्केट संबंधी तसेच रीअल इस्टेटमध्ये गुंतवणूक, नवीन व्यवसाय सुरू करणे यात विश्वास ठेवतात. अनेक लोक या दिवशी गृह प्रवेश, तसेच मंगळ कार्य करणे शुभ