Akshaya Tritiya 2021: कधी आहे अक्षय तृतीया? जाणून घ्या शुभ मुहूर्त

सोमवार, 10 मे 2021 (15:45 IST)
वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला अक्षय्य तृतीया किंवा आखातीज असे म्हणतात. हिंदू धर्मातील सणांपैकी हा महत्तवाचा सण आहे. हा दिवस साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक आहे.
 
अक्षय्य तृतीया संस्कृत शब्द असून याचा अक्षय असा अर्थ आहे अर्थात शाश्वत, सुख, यश आणि आनंद कमी न करणारा आणि तृतीया म्हणजे तिसरा. यंदा अक्षय्य तृतीया 14 मे रोजी शुक्रवारी साजरा केली जाईल. धार्मिक शास्त्रानुसार या दिवशी सोनं खरेदी केल्याने भविष्यात सुख-समृद्धी आणि धनाची प्राप्ती होते. म्हणून या दिवशी सोनं खरेदी करणे शुभ मानले गेले आहे. असे केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते.
 
अक्षय तृतीया शुभ मुहूर्त:
अक्षय तृतीया 14 मे 2021 दिन शुक्रवार
अक्षय तृतीया पूजा शुभ मुहूर्त- सकाळी 05:38 वाजेपासून ते दुपारी 12:18 पर्यंत
पूजेची एकूण अवधी 6 तास 40 मिनिट
तृतीया तिथी प्रारंभ- 14 मे 2021 सकाळी 05:38 वाजेपासून
तृतीया तिथी समाप्ती- 15 मे 2021 सकाळी 07:59 वाजेपर्यंत
 
सोनं खरेदी करण्याचं शुभ मुर्हूत
अक्षय तृतीयेला सोनं खरेदी करण्यासाठी शुभ वेळ 14 में 2021 ला सकाळी 05:38 वाजेपासून सुरु होऊन 15 मे 2021 सकाळी 05.30 वाजेपर्यंत आहे. सोने खरेदी करण्यासाठी एकूण काळ 23 तास 52 मिनिट असा आहे.
 
अक्षय तृतीया महत्तव
पौराणिक मान्यतेनुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी त्रेतायुगाचा आरंभ झाला होता. या दिवशी प्रभू विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. अक्षय तृतीयेला प्रभू विष्णूंच्या सहाव्या अवतार परशुराम यांचा जन्म झाला होता. म्हणून हा दिवस परशुराम जयंती म्हणून देखील साजरा केला जातो. या दिवशी दान केल्याचं खूप महत्त्व आहे. या दिवशी दान केल्याने पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनातील सर्व संकटं दूर होतात.

वेबदुनिया वर वाचा