पॉवर वाढवा अगदी सोप्या घरगुती पदार्थांनी

सेक्स लाईफ सुरळीत असली की मनुष्य आनंदी राहतो. परंतू अनेकदा असंतोष, सुख न मिळणे कमजोरी अशा काही समस्या उद्भवतात. अशात पुरुषांमध्ये कमजोरी डिप्रेशनचे कारण देखील होऊ शकतं. पण त्यात घाबरण्यासारखे काही नाही. पुरुषांमध्ये कमजोरी दूर करण्यासाठी काही घरगुती पदार्थ आहे ज्यामुळे नैसर्गिक रित्या या समस्या सोडवल्या जाऊ शकतात तर जाणून घ्या कोणते असे पदार्थ आहे जे सेवन केल्याने पुरुषांना नक्कीच फायदा होईल.
 
कच्ची भेंडी चावून-चावून खाणे औषधीचे काम करेल.
 
लसणाच्या दोन पाकळ्या झोपण्याआधी सेवन केल्याने फायदा दिसून येईल.
 
ओव्याची पाने स्वप्नदोष समस्येसाठी योग्य औषध आहे. ओव्याच्या पानांचा ज्यूस मधासह घेतल्याने फायदा होतो.
 
टच मी नॉट अर्थात लाजाळूच्या बियांचे 3 ग्राम चूर्ण दुधात मिसळून दर रात्री झोपण्यापूर्वी घेतल्याने कमजोरी दूर होते.
 
आवळ्याचा मुरंबा खाणे फायदेशीर ठरेल.
 
दररोज केळं खाउन त्यावर दूध पिण्याने समस्या दूर होईल.
 
कांदा खाणे नेहमीच फायदेशीर ठरेल. कच्चा कांदा खाणे अधिकच चांगले परिणाम देईल.
 
फास्ट फूड, अधिक प्रमाणात डेअरी प्रॉडक्ट्स, हेवी फूड्स सेवन केल्याने वाईट परिणाम दिसून येतात. असे खाद्य पदार्थ सेवन करणे टाळावे.
 
पुनर्नवा अर्थात घेटुळी या वनस्पतीच्या मुळाचे दोन चमचे ताजे रस दुधासोबत दोन ते तीन महिन्यापर्यंत सेवन केल्याने वृद्ध व्यक्तीला देखील तारुण्य जाणवू लागतं.
 
तिळाचे तेल आणि दुधी भोपळ्याचा रस सम प्रमाणात घ्यावा. रात्री झोपण्यापूर्वी या मिश्रणाने डोकं आणि शरीराची मालीश करावी. याने समस्या दूर होईल.
 
विशेष: स्वस्थ विचार स्वस्थ शरीर ठेवण्यात मदत करतात. या प्रकाराच्या समस्यांसाठी मनातील भावना देखील जवाबदार असतात. सतत वासना, उत्कट विचार स्वप्रदोष किंवा शीघ्रपतन सारख्या समस्यांसाठी कारणीभूत ठरतात. 
 
अशात स्वस्थ विचार ठेवणे आवश्यक आहे कारण ही समस्या केवळ शारीरिक नसून मानसिक देखील असते. म्हणून आनंदी आणि आत्मविश्वासी असणे देखील गरजेचे आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती