काय आपण सेक्ससाठी तयार आहात? जाणून घ्या

काय आपण तयार आहात?
पार्टनर्समध्ये फिजिकल इंटीमेसी फील होणे अगदी सामान्य आहे. परंतू सेक्शुअल रिलेशनशिपमध्ये संबंध बनवण्यासाठी घाई केल्याने समोरचा दुखावला जाऊ शकतो. यासाठी आपसात बोलून आधी स्पष्ट करून घ्यावे की काय आपण सेक्ससाठी तयार आहोत. 
 
नात्यात मजबुती
आपलं चांगलं सुरू आहे आणि आता संबंध पुढे वाढवण्याचा विचार असेल तर आधी नात्यात मजबुती आहे की नाही याची खात्री करून घ्या. आपसात संबंध तेवढे मजबूत नसतील तर संबंध बनवण्यात अर्थ नाही कारण अशात केवळ शारीरिक मेल होऊ शकतो परंतू फिलिंग्स नसतील तर तसा मजा देखील येणार नाही. 
 
सेक्सबद्दल जाणून घ्या
शारीरिक संबंध बनवण्यापूर्वी या बद्दल संपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे. आपण इंटरनेटची मदत घेऊ शकता परंतू हे तेवढेच खरे आहे की इंटरनेटवर उपलब्ध माहिती शंभर टक्के बरोबर असेल असे आवश्यक नाही. याविषयी अनुभवी व्यक्तीचा सल्ला अधिक योग्य ठरेल. सेक्सबद्दल संपूर्ण माहिती, त्यामुळे होणारा चांगले-वाईट परिणाम आणि प्रभाव जाणून घेतल्यावरच पुढे वाढावे.
 
नशा नको
दारू किंवा इतर कोणताही नशा केल्यावर सेक्सपासून दूर राहावे. एकही पार्टनर नशेत असल्यावर दुसरा हर्ट होऊ शकतो. कारण नशेत व्यक्ती योग्यरीत्या विचार करण्यात अक्षम ठरतो अशात आपल्या निर्णयावर पश्चात्ताप होईल असे वागणे योग्य नाही.
 
पार्टनरवर विश्वास
आपल्या पार्टनरवर विश्वास असेल तरच सेक्सबद्दल विचार करावा. असं नसल्यास संबंध स्थापित झाल्यानंतर आपण शारीरिक किंवा मानसिक रूपाने परेशान होऊ शकता.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती