वास्तूनुसार झोपण्याचे देखील नियम असतात, बेडरूम तयार करण्याअगोदर जाणून घ्या...

बुधवार, 17 जुलै 2019 (14:26 IST)
कुठल्याही घरात वास्तूच्या नियमांचे पालन केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती कायम राहते. तसेच वास्तू दोष असल्याने जीवनात बर्‍याच अडचणींचा सामना करावा लागतो. अशात बेडरूम आणि बेडची दिशा निर्धारित करताना याच्याबद्दल जरूर लक्ष ठेवायला पाहिजे. बेडरूमही महत्त्वपूर्ण जागा आहे, जेथे तुम्ही दिवसभराचा थकवा दूर करून एकदा परत आपल्या कामाला निघतात. वास्तुशास्त्रानुसार चुकीच्या दिशेत झोपल्यामुळे तुम्हाला झोप न आल्यामुळे तुम्हाला बर्‍याच अडचणींचा सामना करावा लागतो.
 
काय म्हणतो विज्ञान 
वैज्ञानिक परीक्षणांमुळे हे स्पष्ट झाले आहे की मनुष्याचे शरीर चुंबकीय तरंगांमुळे प्रभावित होत आणि तो स्वत: सूक्ष्म चुंबकीय तरंगांना बाहेर काढतो, जे आभामंडळात आकर्षण आणि विकर्षण उत्पन्न करतो. ज्या प्रकारे पृथ्वीचा उत्तरी ध्रुव आहे, तसाच मनुष्य शरीराचा मस्तिष्काकडे असणारा भाग त्याचा उत्तरी पोल मानण्यात आला आहे. म्हणून संपूर्ण सुखद विश्रामासाठी मनुष्याच्या डोक्याचा भाग नेहमी दक्षिण ध्रुवेकडे असायला पाहिजे, ज्याने चुंबकीय तरंगा योग्य दिशेत प्रवाहित होऊ शकतील. याच्या विपरित उत्तर दिशेत डोकं ठेवून झोपल्याने चुंबकीय प्रवाह अवरुद्ध होऊन बिघडून जाईल. ज्यामुळे मनुष्याला योग्य प्रकारे झोप येणार नाही.

 
पश्चिम दिशेचा प्रभाव
जलाचे अधिपती देवता वरूणाला पश्चिम दिशेचे स्वामी म्हणण्यात आले आहे, जी आमची आत्मा, आध्यात्मिक भावना आणि विचारांना प्रभावित करते. वास्तूनुसार पश्चिम दिशेत डोकं करून झोपणे देखील अनुकूल आहे, कारण ही दिशा नाव, प्रसिद्धी, प्रतिष्ठा आणि समृद्धीला वाढवते.
 
झोपण्यासाठी योग्य आहे दक्षिण दिशा
मृत्यूचा देवता यम दक्षिण दिशेचा स्वामी आहे. या दिशेत डोकं करून झोपणे सर्वात उत्तम मानले गेले आहे. वास्तूत म्हटले गेले आहे की 'स्वस्थ आयू पाहिजे असणार्‍या  मनुष्यांनी आपले डोकं सदैव दक्षिण आणि पाय उत्तरेकडे करून झोपायला पाहिजे.' या दिशेकडे डोकं करून झोपल्याने व्यक्तीला धन, सुख, समृद्धी आणि यशाची प्राप्ती होते. त्याशिवाय व्यक्ती गाढ झोपेचा आनंद घेतो.
म्हणून उत्तर दिशेत झोपण्यास मनाई आहे
धनाधिपती देवता कुबेर उत्तर दिशेचा स्वामी आहे. वास्तूनुसार या दिशेत डोकं करून झोपल्याने झोपेत अडथळा येतो, ज्यामुळे डोकेदुखीचा त्रास निर्माण होतो. जे लोक उत्तरेकडे डोकं आणि दक्षिणेकडे पाय ठेवून झोपतात, त्यांचे रात्रभर या कुशीवरून त्या कुशीवर सुरू असते. पहाटे उठल्यावर त्यांच्या अंगात आळस असतो. मानसिक आजार होण्याची शक्यता वाढते, म्हणून वास्तूप्रमाणे या दिशेत झोपू नये.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती