फ्रेंच फ्राईज आरोग्यासाठी पोषक आहे का ?

शनिवार, 13 जुलै 2019 (16:29 IST)
बटाट्याचे तळलेले काप म्हणजेच फ्रेंच फ्राईज आरोग्याच्या दृष्टीने चांगले नसतात, अशी ओरड अनेक आहारतज्ञ करतात. परंतु, प्रत्यक्षात ते आरोग्यवर्धक असतात. योग्यप्रकारे फ्राय केल्यास फ्रेंच फ्राईज अतिशय पोषक ठरू शकतात, असा दावा काही इटालियन संशोधकांनी केला आहे. फ्रेंच फ्राईज बटाट्यापासून बनविण्यात येतात. तळल्यामुळे ते आरोग्यासाठी चांगले नसतात, असे आहारतज्ञ सागंतात. कारण तेल आणि बटाट्यामुळे शरीरातील चरबी आणि कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढण्याचा धोका असतो. परंतु, इटालियन शेफ ग्लुपेस डॅडीओ यांच्या मते हा पदार्थ आरोग्यास बिलकुल घातक नाही. तळताना अनेक पदार्थ तेल शोषून घेतात. जास्त तेल शोषणारे पदार्थ घातक असल्याचे मनाले जाते. त्यात बटाट्याचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. परंतु, योग्यप्रकारे तळल्यास बटाट्याचे पदार्थ घातक ठरत नाहीत, असे डॅडीओ यांचे म्हणणे आहे. 
 
त्यांनी काही तळण्याचे प्रयोग करून दाखविले. त्यात काही आश्चर्यकारक गोष्टी आढळून आल्या. आरोग्यासाठी पोषक मानल्या गेलेल्या पदार्थांनी बटाट्यापेक्षा 6 पट जास्त तेल शोषून घेतल्याचे आढळले. बटाट्यांमध्ये स्टार्च असते. त्यामुळेच तेल कमी शोषून घेण्यात येते. त्यामुळे काळजीपूर्वक तळल्यास बटाटे आरोग्यासाठी उत्तम सिद्ध होऊ शकतात, असे डॅडीओ यांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती