माझा नवरा माझ्याशिवाय कुठेही जायला नको...

एका महिलेच्या व्रताने प्रसन्न होऊन देव बाप्पा प्रकट झाले आणि त्या महिलेला म्हणाले...
"मुली, काय हवा तो वर माग!"
ती महिला म्हणाली, 
"माझा नवरा माझ्याशिवाय कुठेही जायला नको..."
"अजून काही ?"
 
"माझ्या नवऱ्याच्या आयुष्यात माझ्यापेक्षा जास्त महत्त्वपूर्ण काहीही नसावं...."
"अजून काही ?"
 
मला बघितल्याशिवाय त्याला  झोप येऊ नये ..."
"अजून काही?"
 
"जेव्हा तो सकाळी झोपेतून उठेल व डोळे उघडेल त्यावेळी सगळ्यात पहिले त्यानं मला बघावं..."
"अजून काही ?"
 
"आणि मला जरा देखील खरचटलं तरी वेदना माझ्या नवऱ्याला व्हाव्यात..."
"अजून काही?"

"बस... एवढं पुरेसं आहे देवा!"
"तथास्तु! 
 
आणि 
तात्काळ त्या महिलेचं रुपांतर स्मार्ट फोनमध्ये झालं...!!! 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती