इन्स्टाग्रामवरून लाखोचा गंडा

शनिवार, 24 नोव्हेंबर 2018 (09:21 IST)
पुण्यात इन्स्टाग्रामवर झालेल्या ओळखीतून एका महिलेने एका तरुणाला तब्बल ३३ लाख ५० हजार ९७५ रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी एका अज्ञात महिलेविरुध्द पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.  
 
या प्रकरणात फिर्यादीची  महिलेबरोबर इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाली. या ओळखीनंतर महिलेने भारतात पैसे गुंतविणार असल्याचे त्या व्यक्तीला सांगून व्हॉटसअपवर लंडन ते दिल्ली या विमान प्रवासाच्या तिकीटाचा फोटो पाठविला. तसेच १० सप्टेंबर रोजी दिल्ली एअरपोर्ट येथे येणार असल्याची माहिती दिली. या तारखेला फिर्यादीला दिल्ली कस्टम कार्यालयातून एकाचा फोन आला. त्या व्यक्तीने तुमच्या ओळखीची महिला परदेशातून दिल्ली येथे आली असून तिने यलो पेपरची पुर्तता केली नाही. तसेच तिने सोबत महागड्या वस्तू व फॉरेन करंन्सी आणल्याचे सांगितले. यानंतर फिर्यादीला फॉरेन करंन्सी त्याच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी, दिल्ली ते पुणे विमान तिकीट, फंड रिलीज आॅर्डर आदी कारणांसाठी वेळोवेळी फोन करुन बँकेच्या विविध नऊ खात्यांवर ३३ लाख ५० हजार ९७५ रुपयांची रक्कम वर्ग करण्यास सांगितले. ही रक्कम वर्ग केल्यानंतर संबंधित महिलेने संपर्क क्रमांक बंद केला. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादी यांनी सायबर क्राईम सेलकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती