हिंदी भाषेला सपोर्ट करणारे फिचर इन्स्टाग्रामवर मिळणार

शुक्रवार, 9 नोव्हेंबर 2018 (17:10 IST)

तरूणाईमध्ये इन्स्टाग्राम हे सर्वात लोकप्रिय असलेलं सोशल नेटवर्कींस अॅप आहे. भारतात सध्या जवळपास फेसबुकचे ३० कोटी वापरकर्ते आहेत. त्यामुळेच फेसबुक आता भारतीय वापरकर्त्यांना आवडतील असे अपडेट देत आहे. इन्स्टाग्राम हे फोटो-व्हिडिओ शेअरींग अॅप सुद्धा फेसबुकचेच. त्यामुळे या प्लॅटफॉर्मवरही भारतीय वापरकर्त्यांना आवडेल असे फिचर देण्याचा विचार फेसबुकने दिला आहे. त्यासाठीच लवकरच हिंदी भाषेला सपोर्ट करणारे फिचर इन्स्टाग्रामवर मिळणार असल्याचे फेसबुकने सांगितले आहे.

काही वर्षांपूर्वी फेसबुकने व्हॉटसअॅप या संदेशवहन अॅपची मालकी स्वतःकडे घेतली होती. फेसबुक आणि व्हॉट्सअॅप या दोन्ही प्लॅटफॉर्मवर फेक न्युजशी लढण्याचे आव्हान फेसबुकसमोर आहे. हिंदी भाषिक फिचर आणून भारतातील लोकप्रियता जास्तीत जास्त वाढवण्याकडे इन्स्टाग्रामचा कल असणार आहे. इन्स्टा अॅपचे संशोधक जेन मन्चून वोंग यांनी या बदललेल्या इन्स्टाग्रामचे बिटा व्हर्जनचे काही फोटो नुकतेच जाहीर केले आहेत. यामध्ये कमेंट्स, सेटिंग्ज, प्रोफाईल हे सेक्शन हिंदीमध्ये दिसत आहेत. फेसबुक आणि व्हॉट्सअॅप आधीपासूनच भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे. आता इन्स्टा सुद्धा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हिंदी भाषेत येत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती