युतीची घोषणा १ ऑक्टोबरला होणार ?

शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019 (16:38 IST)
विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना युतीची घोषणा आता १ ऑक्टोबरला होणार असल्याचे बोलले जात आहे. मंगळवारी मुंबईत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संयुक्त पत्रकार परिषदेत युतीची घोषणा करतील असेही सांगण्यात येत आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी २९ सप्टेंबरला मायदेशी परतणार आहेत. तेव्हा अमित शहा युतीचा अंतिम फॉर्म्युला त्यांच्यासमोर ठेवतील. एकदा मोदी यांनी यादीवर शिक्कामोर्तब केल्यानंतर युतीच्या घोषणेचा मार्ग मोकळे होणार आहे. मात्र, नवरात्रीतील नऊ दिवस शुभ असले तरी १ ऑक्टोबर हा सर्वात शुभ असल्याने युतीच्या घोषणेसाठी या दिवसाची निवड अंतिम झाल्याचे सांगण्यात येत आहे. अमित शहा आणि उद्धव ठाकरे हे मंगळवारी आधी प्रभादेवी येथे जाऊन सिद्धीविनायकचे दर्शन घेतील आणि मग पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा करणार आहेत, असे समजते. शुभ मुहूर्तासोबत कुठला दिवस मीडिया कव्हरेजच्यादृष्टीने फायदेशीर ठरू शकतो, याचाही अंदाज युतीची घोषणा करताना विचारात घेण्यात आला आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती