जेलवारी करणाऱ्यांनी सांगू नये की पवारांनी काय केले; शरद पवारांचा अमित शहाना टोला

‘मी आता घरच्यांना सांगितलंय की तुम्ही आता तुमचे बघा. मला अनेकांना बघण्यासाठी बाहेर पडायचंय’, असा सज्जड इशारा देत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना उद्देशून टोला लगावताना, तुरूंगात गेलेल्यांनी सांगू नये की शरद पवारांनी काय केले. असा रोखठोक सवाल केला.
 
सोलापुरमध्ये भाजपाच्या सभेत राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शरद पवार यांनी काय केलं असा प्रश्न केला होता. त्या प्रश्नाला मंगळवारी शरद पवार यांनी सोलापुरातच आयोजित केलेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात उत्तर दिले. मागील कित्येक वर्षापासून राजकारणात आहे. शरद पवार बर वाईट केले म्हणून कधी तुरूंगात गेला नव्हता,असे नमूद करताना शरद पवार म्हणाले की, मी मुख्यमंत्री असताना सकाळी सात वाजता किल्लारीत होतो मात्र आजचे राज्यकर्ते पुराचा दौरा हेलिकॉप्टरने दौरा करतात आणि अर्धा तासात गायब होतात.
 
राज्याच्या प्रमुखाने आपत्तीच्या ठिकाणी मुक्कामी करुन राहावे लागते कारण त्याशिवाय यंत्रणा हालत नाही. मी काय म्हातारा झालो, अजून लय जणांना घरी पाठवायचेय. ते कशाच्या जोरावर पाठवायचे, येथे उपस्थित तरुणाईच्या जोरावर पाठवायचेय असेही ते म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती