आता नागरिकांकडे एकच 'युनिव्हर्सल' ओळखपत्र असेल: अमित शाह

मंगळवार, 24 सप्टेंबर 2019 (12:39 IST)
आधार, वाहनचालक परवाना, बँक खाते, पासपोर्ट अशा अनेक ओळखपत्रांपेक्षा नागरिकांकडे बहुपयोगी असे एकच ओळखपत्र असायला हवे, असा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी मांडला.
 
दिल्लीतील जनगणना भवनाच्या नवीन वास्तूच्या भूमिपूजन कार्यक्रमात शाह यांनी ही भूमिका मांडली.
 
"एका व्यक्तिची विविध प्रकारची माहिती एकाच कार्डमध्ये साठवलेली असेल तर ते अधिक उपयुक्त ठरू शकेल. अर्थात त्यासाठी जनगणनेची माहिती डिजिटल स्वरूपात साठवली गेली पाहिजे. हे एक क्रांतिकारी पाऊल असेल," असं शाह यांनी म्हटलं.
 
यासाठी 2021 साली होणारी जनगणना ही डिजिटल पद्धतीनं केली जाणार असून त्यासंबंधी एक स्वतंत्र अ‍ॅप तयार करण्यात येणार असल्याचं शाह यांनी सांगितलं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती