मुस्लिम पक्षकारांनीही मान्य केलं रामजन्मभूमीचं अस्तित्व

मंगळवार, 24 सप्टेंबर 2019 (12:31 IST)
अयोध्या राम मंदिरप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीमध्ये मुस्लिम पक्षकारांनी रामजन्मभूमीचं अस्तित्व मान्य केलं आहे. 
 
राम मंदिरप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात गेल्या 29 दिवसांपासून सलग सुनावणी सुरू आहे. मुस्लिम पक्षकारांचे वकील राजीव धवन यांनी सुनावणीदरम्यान म्हटलं, की त्या ठिकाणी रामाचा जन्म झाला होता किंवा तिथे राम मंदिर होतं हे आम्ही मान्य करतो. पण त्या ठिकाणी केवळ राम मंदिर असावं हे हिंदू पक्षकारांचं जे म्हणणं आहे, ते आम्हाला मान्य नाही. या देशात जेवढं महत्त्व रामाचं आहे, तेवढंच अल्लाहचंही आहे. याच भावनेवर हा देश उभा राहिला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती