‘जागावाटपाचा तिढा सोडविण्यासाठी आम्ही दोन पावले पुढे आलो आहोत, शिवसेनेनेही दोन पावले पुढे यावे,’ असा विनवणीचा सूर शहा यांनी लावला आहे.
शिवसेना-भाजपमधील जागावाटपाचा तिढा कायम असल्याने राज्यातील नेत्यांशी सल्लामसलत करण्यासाठी अमित शहा हे आठवडाभरातच पुन्हा महाराष्ट्रात आले आहेत. गुरुवारी सकाळी शहा यांनी महाराष्ट्रातील त्यांची सासुरवाडी कोल्हापूर येथे जाऊन महालक्ष्मीचे दर्शन घेतले. त्यानंतर कार्यकत्र्यांना संबोधित केले. यावेळी युतीच्या तिढय़ावरही शहा यांनी भाष्य केले.