राज-उद्धव एकत्र येणार हे नक्की! -नाना

बुधवार, 8 ऑक्टोबर 2014 (12:40 IST)
'बेट लावून सांगतो,या निवडणुकीनंतर राज आणि उद्धव एकत्र येणार', असा ठाम दावा ‍अभिनेते नाना पाटेकर यांनी एका खसगी वृत्तवाहिनीवरील वार्तालापाच्या कार्यक्रमात केला. हे दोन्ही भाऊ एकत्र यावे म्हणून मी स्वत: प्रयत्न केले होते, असेही नानाने यावेळी सांगितले. 
 
राज आणि उद्धव यांनी एकत्र यावं, असे मला मनापासून वाटते. आता निवडणुकीनंतर कोणाच्या किती जागा निवडून येतात, त्यावर सर्व काही अवलंबून आहे. पण हे दोघे भाऊ एकत्र येतील, अस मला तरी विश्वास वाटतो, असे नाना पुढे म्हणाले. 
 
हे दोघे भाऊ एक‍त्र येण्याने महाराष्ट्राला  काय फरक पडणार आहे? 
त्यावर नाना म्हणाले की काय फरक पडणार हे मला माहित नाही, पण आले तर चांगलच आहे, अशी पुष्टी त्यांनी केली. 
 
राज-उद्धव टाळीसाठी तू केलेले प्रयत्न सपल का झाले नाहीत असे विचारले असता मी किंवा आणखी कुणी काहीही सांगितले तरी ठाकरे त्यांना वाटेल ते करतात, असे नाना म्हणाले. महाराष्ट्रात सगळेच पक्ष स्वबळावर लढत आहेत. त्यामुळे फायनल कुणामध्ये होणार काहीच कळत नाही. युती तुटली नसती तर असे झाले नसते. युती विरुद्ध आघाडक्ष अशी तुल्यबळ लढत झाली असती असे नाना म्हणाले. 
 
मतदारांनी डोळसपणे मतदान करावे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना मग तो कोणत्याही पक्षाचा असोत मतदान करू नका, असे आवाहन यावेळी नानांनी केले. मला राजकारणात यायचे नाही. माझा पक्ष म्हणजे माझा कॅमेरा आहे, असे नाना एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा