मिळालेल्या माहितीनुसार, संजू हा 2024 मध्ये टी-20 मध्ये शतक करणारा पहिला भारतीय यष्टीरक्षक आहे आणि सलग दोन शतके करणारा पहिला भारतीय फलंदाज आहे. त्याने एका कॅलेंडर वर्षात जास्तीत जास्त तीन टी-20 शतके केली आहेत. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर बांगलादेशविरुद्ध 47 चेंडूत 111 धावा करून संजूच्या शतकी मालिकेची सुरुवात झाली. त्याच्या खेळीमुळे भारताने मालिका 3-0 अशी जिंकली.
त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध किंग्जमीड, डर्बन येथे फक्त 50 चेंडूत 107 धावांची धमाकेदार खेळी केली. या सामन्यात भारताला 61 धावांचा मोठा विजय मिळाला. सॅमसनने स्फोटक फलंदाजीने वर्षातील तिसरे टी-20 शतक झळकावून आणि 56 चेंडूत नाबाद 109 धावा करून इतिहास रचला.
गेल्या वर्षी सॅमसनने 13 सामन्यांमध्ये तीन शतके आणि एका अर्धशतकासह एकूण 436 धावा केल्या. त्याचा सर्वोच्च शतकाचा विक्रम111धावांचा आहे. यादरम्यान त्याने 35 चौकार आणि 31 षटकार मारले. त्याला न्याय मिळावा अशी मागणी करणाऱ्या चाहत्यांना आशा आहे की, जर त्याला संधी मिळाली तर तो यावर्षीही धमाल करेल.