पॅन-आधार या प्रकारे करा लिंक
• भारतीय आयकर विभागाच्या वेबसाईटवर जा.
• तिथे डाव्या बाजूस विविध पर्यायांची यादीत 'Link Aadhar' या पर्यायावर क्लिक करा.
• पॅन-आधार लिंक होण्यास काही वेळ लागतो. त्यामुळं लिंक झालंय की नाही, हे पाहण्यासाठी याच ठिकाणी 'तुमचं पॅन-आधार लिंक झालंय का ते इथं पाहा' अशा आशयाचं इंग्रजी/हिंदीत लिहिलेलं दिसेल. त्यावर क्लिक करून तुम्ही तुमचं पॅन-आधार लिंक झालंय की नाही, ते पाहू शकता.
SMS द्वारे या प्रकारे करा लिंक
SMS मध्ये UIDPN टाइप करा. नंतर स्पेस देऊन आपला आधार नंबर आणि त्यानंतर पॅन नंबर टाइप करा. UIDPAN<space><12-digit Aadhaar><space><10-digit PAN> या प्रकारे लिहून 567678 किंवा 56161 वर पाठवा. यानंतर आयकर विभाग दोन्ही नंबर लिंक करण्याची प्रोसेस सुरु करेल.