काय सांगता, आधार कार्डच्या डेटाचा चुकीचा वापर देखील होऊ शकतो कार्ड अशा प्रकारे लॉक करा
सोमवार, 15 मार्च 2021 (21:15 IST)
आधार कार्ड प्रत्येक भारतीयांची ओळख आहे. बऱ्याच सरकारी कामांमध्ये याचा वापर केला जातो. या मध्ये त्या व्यक्तीशी संबंधित आवश्यक डेटा दिलेला असतो. या डेटाचा गैर वापर देखील केला जाऊ शकतो. केंद्र सरकार देखील आधार डेटाची गोपनीयता राखण्यासाठी बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी सुरू करत असते. आपल्या डेटाचा कोणीही गैरवापर करू नये यासाठी आपण आपल्या आधार कार्डाला लॉक देखील करू शकता. चला तर मग आधार कार्ड लॉक करण्याची प्रक्रिया जाणून घेऊ या.
आधार कार्डाचा अर्थ आहे 12 अंकी क्रमांक आणि या ऐवजी 16 अंकी व्हर्च्युअल आयडी(VID)चा वापर कोणत्याही प्रकारच्या आवश्यक प्रमाणीकरणासाठी केला जाऊ शकत नाही.एखाद्या व्यक्तीने आधार कार्ड लॉक केल्यावर त्याला UID,UID टोकन इत्यादींच्या प्रमाणीकरणावर प्रोसेस केले जाऊ शकत नाही. या मध्ये बायोमेट्रिक, डेमोग्राफिक आणि ओटीपी आधारित प्रमाणीकरण देखील काम करणार नाही. जर एखाद्याला आपला यूनिक आयडी अनलॉक करावयाचा आहे तर त्याच्या रेजिडेंट पोर्टलवर जाऊन अनलॉक केले जाऊ शकते. अनलॉकिंग केल्यावर सर्व प्रकाराच्या ऑथेन्टिकेशन किंवा प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते.
आधार धारकांकडे बायोमेट्रिक्स लॉक (Aadhaar Biometric Lock) करण्याचे पर्याय देखील आहे. बायोमेट्रिक लॉक किंवा अनलॉक करण्याची एक अशी सुविधा आहे.या मुळे आधार कार्ड धारक काही काळा साठी आपल्या बायोमेट्रिक ला लॉक करतो आणि गरज पडल्यास अनलॉक करतो.या सुविधेचा मुख्य हेतू बायोमेट्रिक डेटाच्या गोपनीयतेला सुरक्षित ठेवणे आहे. बायोमेट्रिक लॉक केल्याने हे सुनिश्चित होते की फिंगरप्रिंट किंवा डोळ्याच्या पापण्यांशी निगडित डेटाचा गैरवापर केला जाऊ शकत नाही. आधार कार्ड धारक सहजपणे आपल्या बायोमेट्रिकला अनलॉक देखील करू शकतो.
बायोमेट्रिक लॉक किंवा अनलॉक करणे-
या साठी आपल्याला रेजिडेंट पोर्टल वर जावे लागेल. या पोर्टलवर My Adhaar विभागात गेल्यावर Aadhaar Service मध्ये जावे. या मध्ये lock/unlock biometrics पर्याय दिले जाते. पुढील चरणात आपला आधार क्रमांक किंवा VID क्रमांक प्रविष्ट करा.कॅप्टचा कोड दिल्यावर आपल्या अधिकृत असलेल्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल. ओटीपी दिल्यावर सबमिट करावे. असं केल्याने आपले बायोमेट्रिक लॉक होईल.आधार बायोमेट्रिक अनलॉक करण्यासाठी देखील समान प्रक्रियेचे अनुसरणं करावे.
युनिट आयडेंटिफिकेशन लॉक करण्यासाठी एखाद्या व्यक्तीकडे 16 अंकी व्हर्च्युअल आयडी नंबर असणे महत्त्वाचे आहे.जर एखाद्या कडे VID नंबर नसल्यास आपण एसएमएस ने जनरेट देखील करू शकता. या साठी मेसेज बॉक्स मध्ये GVID लिहून स्पेस दिल्यावर शेवटचे 4 किंवा 8 अंक लिहावे लागतील. नंतर हा मेसेज 1947 वर पाठवा.
अशा प्रकारे लॉक करा-
सर्वप्रथम रेसिडेंट पोर्टलवर जाऊन My Adhaar सेक्शन मध्ये जाऊन Aadhaar Service मध्ये lock/unlock वर क्लिक करा.
या मध्ये UID लॉक रेडिओ बटनावर क्लिक करा आणि आधार नंबर प्रविष्ट करा. नंतर आपले संपूर्ण नाव, पिनकोड आणि नवीन तपशीलवार माहिती दिल्यावर सिक्युरिटी कोड द्यावा लागेल. नंतर ओटीपी साठी क्लिक करा किंवा TOTP निवडून सबमिट बटन वर क्लिक करा.
अनलॉक कसे करावे-
आपल्या यूनिक आयडी अनलॉक करण्यासाठी नवीन VID नंबर असायला पाहिजे. जर आपण आपल्या 16 अंकी VID क्रमांक विसरता तर आपण तो परत रिट्रिव्ह देखील करू शकता. या साठी आपण RVID लिहून स्पेस देऊन आधार क्रमांकाचे शेवटचे 4 किंवा 8 अंकी क्रमांक लिहून 1947 वर पाठवावे लागणार.
VID मिळाल्यावर unlock रेडिओ बटनावर क्लिक करावे लागणार आणि नवीन VID क्रमांक प्रविष्ट करावा लागेल. नंतर सिक्योरिटी कोड प्रविष्ट करून ओटीपी मागवा किंवा TOTP निवडून सबमिट वर क्लिक करा. असं केल्याने आपले आधार कार्ड अनलॉक होऊन जाईल.