थायलंड ओपन 2021: सायनाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे वृत्त चुकीचे

बुधवार, 13 जानेवारी 2021 (11:46 IST)
भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू तसेच लंडन ऑलिम्पिकधील कांस्यपदक विजेती सायना नेहवालला आजपासून सुरू होणार्या थायलंड ओपन 2021 बॅडमिंटन स्पर्धेत खेळण्याची परवानगी देण्यात येईल. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनकडून सायनाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे सांगण्यात आले होते. तिला बँकॉकमध्ये 10 दिवस आसोलेशनमध्ये राहण्यास सांगणत आले होते. मात्र, बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियामधील सूत्रांनी सायनाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त चुकीचे असल्याचे म्हटले आहे. तिला आजपासून स्पर्धेत सहभागी होता येईल असे सांगण्यात आले.
 
सायना नेहवाल हिला कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर नेहवालने मंगळवारपासून सुरू होणार्याल थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतून माघार घेतली आहे, असे वृत्त मंगळवारी सकाळी देण्यात आले होते. ते चुकीचे असल्याचे सांगणत आले. कोरोनामुळे जवळपास 10 महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय बॅडटिंन स्पर्धांना सुरुवात होत आहे. थायलंडमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्याने चीनने या स्पर्धेतून माघार घेतली आहे.   

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती