फ़ुटबाँल सामना दरम्यान एका खेळाडूवर वीज कोसळून त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात इंडोनेशियातील एका सामना दरम्यान घडला आहे. खेळाडूचा रुग्णालयात नेतानाच दुर्देवी मृत्यू झाला.
इंडोनेशियातील एफसी बांडुंग आणि एफबीआय शुबांग यांच्यात सामना शनिवारी इंडोनेशियातील पश्चिम जावा येथील सिलिवांगी स्टेडियमवर खेळला गेला .या वेळी सामना खेळणाऱ्या खेळाडूवर वीज कोसळली.
दरम्यान, मैदानाच्या एका बाजूला उभ्या असलेल्या खेळाडूवर अचानक वीज पडली. व्हिडीओमध्ये विजांच्या कडकडाटादरम्यान भीषण आग बाहेर पडताना दिसत आहे. वीज खेळाडूवर कोसळली होती. विजेचा धक्का लागतातच खेळाडू खाली कोसळला.