पीआर श्रीजेशच्या सन्मानार्थ वरिष्ठ संघासाठी 16 क्रमांकाची जर्सी निवृत्त करण्याचा हॉकी इंडियाच्या मोठा निर्णय

बुधवार, 14 ऑगस्ट 2024 (18:59 IST)
हॉकी इंडियाने बुधवारी महान गोलरक्षक पीआर श्रीजेशची16 क्रमांकाची जर्सी निवृत्त करण्याचा निर्णय घेतला. नुकत्याच पार पडलेल्या पॅरिस गेम्समध्ये देशाला सलग दुसरे ऑलिम्पिक पदक जिंकून देण्यात या स्टार खेळाडूने महत्त्वाची भूमिका बजावली. यानंतर त्यांनी निवृत्ती जाहीर केली. 
 
हॉकी इंडियाचे सरचिटणीस भोला नाथ सिंग यांनी जाहीर केले की, जवळपास दोन दशके 16 क्रमांकाची जर्सी परिधान करणारा 36 वर्षीय श्रीजेश कनिष्ठ हॉकी संघाच्या राष्ट्रीय प्रशिक्षकाची भूमिका बजावेल. ते म्हणाले, "श्रीजेश आता ज्युनियर संघाचा प्रशिक्षक बनणार आहे आणि आम्ही वरिष्ठ संघासाठी 16 क्रमांकाची जर्सी निवृत्त करत आहोत. आम्ही कनिष्ठ संघासाठी 16 क्रमांकाची जर्सी निवृत्त करत नाही आहोत."
 
स्पेनचा 2-1 असा पराभव करून भारताने कांस्यपदक जिंकले आणि यासह श्रीजेशने हॉकीला निरोप दिला. श्रीजेशने पॅरिस ऑलिम्पिकमध्येही चमकदार कामगिरी केली.संघाने श्रीजेशला विजयासह निरोप दिला.
Edited by - Priya Dixit   
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती