तीन वर्षांनंतर राजधानी पुन्हा हादरली

WDWD
तीन वर्षानंतर पुन्हा एकदा राजधानी दिल्लीत झालेल्या चार बॉम्बस्फोट मालिकेने हादरली. या बॉम्बस्फोट मालिकेत 20 जण ठार झाले तर अनेक जण जखमी झाले. यानंतर आजही राजधानीत दहशतीचे वातावरण आहे. मुंबई हल्ल्यांप्रमाणेच राजधानीत झालेले हल्ले दहशतवाद्यांचे मनसुबे स्पष्ट करणारे होते.

2008मध्ये राजधानीत झालेल्या या हल्ल्यांनंतरही सरकार आणि सुरक्षायंत्रणा जाग्या न झाल्याने मुंबईत याच हल्ल्यांची पुनरावृत्ती झाली.

तीन वर्षापूर्वी दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोट मालिकांचा आढावा-

23 मे 1996- लाजपत नगर येथील सेंट्रल मार्केटमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात 16 जण ठार झाले होते.

9 जानेवारी 1997- आयटीओ येथील पोलिस मुख्यालयाजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात 50 जण जखमी झाले होते.

1 ऑक्टोबर 1997- सदर बाजार भागात झालेल्या दोन बॉम्बस्फोटात 30 जण जखमी झाले होते.

10 ऑक्टोबर 1997- शांतीवन कौडीया पूल (किंग्जवे कॅम्प) भागात झालेल्या तीन बॉम्बस्फोटात एक जण ठार तर 16 जण जखमी झाले होते.

18 ऑक्टोबर 1997- राणी बाग बाजारात झालेल्या दोन बॉम्बस्फोटात एक जण ठार व 23 जण जखमी झाले होते.

26 ऑक्टोबर 1997- करोलबाग भागात झालेल्या दोन बॉम्बस्फोटात एक जण ठार व 34 जण जखम‍ी झाले होते.

30 नोव्हेंबर 1997- लाल किल्ला परिसरात झालेल्या दोन बॉम्बस्फोटात तीन जण ठार व 70 जण जखमी झाले होते.

30 नोव्हेंबर 1997- पंजाबी बाग पररिसरात रामपुरा चौकात ब्ल्यू लाइन बसमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात चार जण ठार व 30 जण जखमी झाले होते.

22 मे 2005- दिल्ली येथील दोन चित्रपटगृहात बॉम्बस्फोटात एक जण ठार व अनेक जण जखमी झाले होते.

29 ऑक्टोंबर 2005- दिवाळीच्या आदल्या दिवशी राजधानीतील गर्दीच्या ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटात 62 जण ठार व शंभराहून अधिक जण जखमी झाले होते.

वेबदुनिया वर वाचा