गेल्या अडीच वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुभावामुळे मुलांच्या परीक्षा घेण्यात आल्या नव्हत्या. यंदाच्या वर्षी 10 वी ची परीक्षा ऑफलाईन असल्यामुळे आणि विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रा पर्यंत जाण्याची कोणतीही अडचण येऊ नये. या साठी यंदा राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून शाळा तेथे केंद्र म्हणजे मुलांची शाळाच त्यांचे परीक्षा केंद्र असणार. या साठी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर परीक्षेच्या एक तास आधी पोहोचावे लागणार. विद्यार्थ्यांची गर्दी टाळण्या साठी परीक्षा केंद्रावर थर्मल स्क्रिनींग साठी आणि सेनेटायजेशन सुविधेसाठी लवकर परीक्षा केंद्रावर पोहोचण्याचे आवाहन राज्य मंडळाकडून करण्यात आले आहे.
तसेच विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी 12 वीच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच जास्तीची वेळ देण्यात देण्यात आली आहे. या साठी पेपर सुरु होण्याच्या अर्धा तासापूर्वी विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश देण्यात येईल. तर प्रश्न पत्रिका 10 मिनिटा पूर्वी वाटप केल्या जातील. विद्यार्थ्यांना 70 ते 100 गुणांचा पेपरसाठी अर्धा तास जास्तीचा तर 40 ते 60 गुणांचा पेपर साठी 20 मिनिटे जास्तीचा वेळ देण्यात आला आहे.