कोण आहेत IAS सुजाता सौनिक? ज्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव झाल्या

सोमवार, 1 जुलै 2024 (11:35 IST)
वरिष्ठ IAS अधिकारी सुजाता सौनिक यांनी रविवारी महाराष्ट्राच्या नवीन मुख्य सचिवपदाचा पदभार स्वीकारला. त्यांनी निवृत्त आयएएस नितीन करीर यांची जागा घेतली आहे. यासह सुजाता सौनिक या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनल्या आहेत.
 
1987 च्या बॅचच्या IAS अधिकारी सुजाता सौनिक यांच्याकडे रविवारी संध्याकाळी दक्षिण मुंबईतील मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात नितीन करीर यांच्या हस्ते पदभार सोपवण्यात आला. महाराष्ट्राच्या 64 वर्षांच्या इतिहासात हे सर्वोच्च पद भूषवणाऱ्या सौनिक या पहिल्या महिला ठरल्या आहेत.
 
नितीन करीर हे मुख्य सचिव पदावरून निवृत्त झाले आहेत. तर IAS सुजाता सौनिक पुढील वर्षी जूनमध्ये निवृत्त होत आहेत. म्हणजेच त्यांचा कार्यकाळ एक वर्षाचा असेल. सौनिक हे यापूर्वी राज्याच्या गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव होत्या. सरकारने त्यांना बढती देऊन मुख्य सचिव केले आहे.
 
IAS सुजाता सौनिक यांना आरोग्यसेवा, वित्त, शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन आणि जिल्हा, राज्य आणि संघराज्य स्तरावर शांतता राखणे आणि भारतीय प्रशासकीय सेवा आणि संयुक्त राष्ट्रांच्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये सार्वजनिक धोरण आणि प्रशासनाचा तीन दशकांहून अधिक अनुभव आहे. त्यांचे पती मनोज सौनिक हेही राज्याचे मुख्य सचिव राहिले आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती