विजय वडेट्टीवार यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
सोमवार, 1 जुलै 2024 (10:01 IST)
विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांची प्रकृती बिघडली असून त्यांना रविवारी सायंकाळी नागपुरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना पोटाचा त्रास झाला आहे. गेल्या तीन चार दिवसांपासून त्यांची प्रकृती बरी नव्हती त्यांनी मुंबईत उपचार घेतलं तरीही त्यांना अस्वस्थ वाटत होते. आता त्यांना नागपुरातील
रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.
ते आज अधिवेशनाच्या सभागृहात उपस्थित राहू शकणार नाही.अशी माहिती मिळत आहे. आज विधानसभेत मुंबईतील अनधिकृत होर्डिंगवरून राजकारण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु असून राज्यातील अनेक मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. आज देखील मुंबईतील अनधिकृत होर्डिंग आणि मुंबईतील म्हाडाच्या अभ्युदय नगर वसाहतीच्या पुनर्वसनाचा प्रश्न देखील मांडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.