या चक्रीवादळाला 'तेज' नाव दिले असून रविवार दुपार नंतर हे अधिक तीव्र होऊन सक्रिय होईल. तेज चक्रीय वादळ सक्रिय झाल्यावर दक्षिण पश्चिम अरबी समुद्रावर 125 -135 किमी प्रतितासाने वादळी वाऱ्याचा वेग असण्याची शक्यता आहे. काही राज्य केरळ, तामिळनाडू, मध्ये ढगांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. जम्मू-काश्मीर, पंजाब, पश्चिम राजस्थान आणि लडाख, पुडुचेरी मध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तेज चक्रीवादळ अधिक सक्रिय होण्याची शक्यता वर्तवल्यामुळे आंध्र आणि तामिळनाडू किनारपट्टीवर काम करणाऱ्या मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा भारतीय तटरक्षक दलाने दिला आहे. भारतीय तटरक्षक दलाने आंध्र, चैन्नई, तामिळनाडू किनारपट्टीवर जहाजे तैनात केली आहे. तसेच येत्या 25 ऑक्टोबर पर्यंत मासेमारीसाठी मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचे आवाहन केले आहे.