विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा

सोमवार, 22 एप्रिल 2019 (09:38 IST)
एकीकडे राज्यात अवकाळी पाऊस होत असतानाच हवामान खात्याने पुन्हा एकदा विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. 23 ते 25 एप्रिल दरम्यान विदर्भात उष्णतेची लाट येणार येऊ शकते.
 
मुंबईचा विचार करता मुंबईचे कमाल तापमान 33 अंशावर स्थिर असले, तरी प्रत्यक्षात मात्र उन्हाचा तडाखा आणि वाढता उकाडा मुंबईकरांचा आणखी घाम काढणार आहे.
 
भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे होते.
 
राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास राहिल असं सांगण्यात आलं आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती