हा व्हिडीओ मुंबईच्या वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेचा असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबईतील वाकोला उड्डाणपुलावर टॅक्सीमध्ये बसलेल्या व्यक्तीचा लोकांनी व्हिडिओ बनवला. टॅक्सीच्या छतावर बसलेली व्यक्ती ड्रायव्हरला थांबायला सांगत आहे. मात्र चालक भरधाव वेगाने टॅक्सी चालवताना दिसत आहे.
वाकोला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्हिडिओचा तपास सुरु आहे. पोलिसांना हा व्हिडीओ मिळाला आहे. पोलिसांकडे सध्या कोणतीही तक्रार आलेली नाही. व्हिडीओमध्ये दिसणारी व्यक्ती आणि चालकाचा शोध घेतला जात आहे. टॅक्सीचा नोंदणी क्रमांक महाराष्ट्राचे आहे. हा तरुण टॅक्सी चालकाला गाडी थांबवण्याची वारंवार विनंती करत आहे मात्र चालक त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत आहे.