एसआयटी नेमताना पुलीस भी तुम्हारी, लोक भी तुम्हारे, और जजमेंट भी तुम्हारा ये बात नही चलेगी.या प्रकरणात सन्मानीय उच्च न्यायालयाच्या अखत्यारीत असणारी त्यांच्या सुपरव्हीजन खाली असणारी एसआयटी असली पाहिजे अशी मागणी शिवसेनेच्या नेत्या सुषणा अंधारे यांनी केली आहे.
शीतल म्हात्रे व्हीडीओ व्हायरल प्रकरणी कल्याणमधील ठाकरे गटाच्या विनायक डायरे याला दहिसर पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर शिंदे गटाच्या तीन जणांनी डायरे यांच्या कुटुंबियांना धमकाविले. जीवे मारण्याची धमकी दिली. डायरे यांच्या कुटुंबियांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असता पोलिसांनी नावानिशी तक्रार नोंदविली नाही. डायरे कुटुंबीयांची आज शिवसेना नेत्या अंधारे यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी ही मागणी केली. आम्ही चुकीच्या कृतीचे समर्थन करीत नाहीत. अशा एखाद्या घटनेचे निमित्त करुन जर तुम्ही आमच्या कार्यकत्र्याना नाहक त्रस दिला जात आहे. प्रकाश सुव्रे या प्रकरणात काहीच बोलत नाहीत. त्यांनी बोलणो फार अपेक्षित आहे.कारण त्यांची बहिण शीतल म्हात्रे या त्यांना भाऊ ा माणतात. भावाने बहिणीवर घाणोरडे आरोप होत असताना भावाने पुढे आले पाहिजे. बोलले पाहिजे. मात्र ते का बोलत नाही. याचा अर्थ कुठे तरी म्यूनिप्यूशन होत आहे का याचाही विचार केला पाहिजे.
Edited by : Ratnadeep Ranshoor