कोकणात देखील मुसळधार पावसासह ढगफुटी होण्याची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तविली आहे.मुंबई,पालघर,ठाणे,रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस येण्याचा इशारा देखील हवामान खात्याने दिला आहे तसेच पावसासह जोरदार वारे असण्याचे देखील सांगितले आहे.
रत्नागिरीत देखील 11 आणि 12 जून रोजी मोठ्या प्रमाणावर पाऊस येण्याची शक्यता वर्तविली आहे त्याच सह हा पाऊस ढग फुटी प्रमाणे असल्याचे देखील सांगत आहे.मुंबईत देखील पाऊसामुळे लोकांची चांगलीच धांदल उडाली आहे. सर्वी कडे पाणीच पाणी झाल्यामुळे लोकांना वाहतुकीत अडथळा निर्माण होत आहे. अतिवृष्टीचा इशारा मिळाल्यावर लोकांना घरातच राहण्याचा सल्ला दिला जात आहे.