राज्यातील तापमानात वाढ, कोरडे हवामान राहणार

सोमवार, 4 मे 2020 (09:40 IST)
राज्याच्या बहुतांश भागांत सध्या कोरडे हवामान असल्यामुळे तापमानात वाढ नोंदविली जात असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. पुढील आठवड्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
 
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार ४ मे रोजी संपूर्ण राज्यामध्ये कोरडे हवामान राहणार आहे. ५ मे रोजी विदर्भात काही ठिकाणी पावसाची हजेरी असणार आहे. इतर ठिकाणी मात्र हवामान कोरडे राहील. तसेच ६- ७ मे रोजीही संपूर्ण राज्यात कोरड्या हवामानाची स्थिती निर्माण होणार आहे. परिणास्वरुप या आठवड्यात राज्यातील तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
 
सध्या मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तसेच मराठवाडा आणि विदर्भात सर्वच ठिकाणी तापमानाचा पारा ४३ ते ४४ अंश सेल्सिअसच्याही पुढे गेला आहे. दरम्यान, विदर्भात पावसाची शक्यता कायम असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती