रमजानसाठी रस्ते भरणार मात्र आम्हला बांबू पडणार

रविवार, 3 मे 2020 (15:08 IST)
लॉकडाउन दरम्यान दुजाभावाबद्दल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत म्हटले की रमजानसाठी सगळीकडे रस्ते भरले आणि आम्ही रस्त्यावर आलो की बांबू खावे लागणार, असं कसं चालेल.
 
एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले की सुरूवातीच्या काळातील गोष्टी सोडल्या तर सध्या काही बरोबर चालत असल्याचे दिसून यते नाहीये. रमजान सणासाठी रस्ते भरत आहेत. आणि आम्ही लोकं रस्त्यावर आल्यावर त्यांना बांबू खायला लागणार, हे काही बरोबर नाही.
 
सगळ्यांना समान न्याय आणि वागणूक असली पाहिजे. सगळ्यांना सगळ्यांचा धर्म आहेच की... आमचे सण- उत्सव आम्ही घरामध्ये साजरे केले. मग अशा ठराविक लोकांसाठी अशा गोष्टी का होतायेत? असा सवाल राज यांनी उपस्थित केला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती