मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधताना लॉकडाउनमधून मुंबई, ठाणे, पुणेकरांना दिलासा दिला जाणार नसल्याचे संकेत दिले आहेत. रेड झोनमध्ये असणाऱ्या मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, औरंगाबादमध्ये लॉकडाउन वाढवला जाण्याची शक्यता आहे.
अर्थचक्र रुतलं आहे. बेरोजगारी वाढणार असं सांगितलं जात आहे. परंतू अर्थासोबत संपत्ती जर म्हणाल तर प्रत्येक राष्ट्राची आणि राज्याची महत्त्वाची आणि खऱी संपत्ती त्यांची जनता असते. त्यांना प्राथमिकता दिली पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की नागरिक वाचले पाहिजेत. ते सैनिक आहेत. ते वाचले तर हा गाडा चिखलातून काढून पुढे नेऊ शकतो.
ज्या ठिकाणी आकडे वाढत आहेत तिथे काही करणे हिताचं नाही,” असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. त्यामुळे मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर या ठिकाणी लॉकडाउनचा कालावधी वाढवला जाण्याची शक्यता आहे.