तळेगाव येथील अल्पवयीन बालिका अत्याचार प्रकरणाचा पोलीस तपास पूर्ण झाला आहे. आता संशयिताविरोधात सुमारे तीनशे पानांचे दोषारोप पत्र तयार करण्यात आले आहे.तर आज १९ व्या दिवशी सरकारने हे आरोपत्र न्यायालयात दाखल केले आहे. या प्रकरणातील आरोपी हा अल्पवयीन मुलगा आहे. या प्रकरणाने नाशिक मध्ये दंगल स्थिती निर्माण झाली होती तर कोट्यावधी रुपयांचे नुकसान सुद्धा झाले होते. सर्वाधिक फटका हा राज्य परिवहन आयोगाला बसला होता. मराठा समाज विरुद्ध मागासवर्गीय समाज असे चित्र काही समाजकंट लोकांनी निर्माण केले होते.
ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्र्यंबकेश्वर पोलिसांनी अवघ्या पंधरा दिवसात या प्रकरणाचा तपास पूर्ण केला आहे. यात सुमारे तीनशे पानांचे दोषारोपपत्र तयार केले आहे़. पोलिसांनी तयार केलेल्या या दोषारोपपत्राबाबत जिल्हा सरकारी वकीलांकडून मार्गदर्शन घेतले आहे़. जिल्हा सरकारी वकीलांकडे सादर करण्यात आलेल्या या दोषारोपत्रावर मार्गदर्शन घेतल्यानंतर सादर केले आहे.