या अपघातात रोहित यांना डोक्याला जबर मार लागला त्यांना रुग्णालयात नेले असता त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. रोहित यांची दोन महिन्यांपूर्वीच आलेवाडी येथे तलाठी म्हणून नियुक्ती झाली. त्यांचा वर्षभरापूर्वी लग्न झाले असून त्यांच्या पश्चात आई- वडील, पत्नी आणि विवाहित बहीण असा परिवार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहित हे 20 नोव्हेंबर रोजी निवडणुकीच्या कामासाठी तैनात होते. साताऱ्यात दिवसभर मतदान प्रक्रिया सुरू राहिल्यानंतर मतपेट्या जमा झाल्या. यानंतर रात्री 2 वाजण्याच्या दरम्यान ते साताऱ्याहून भुईंज या गावी निघाले. मात्र पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना त्यांची दुचाकी उसाने भरलेल्या ट्रॉलीला धडकली.
रस्त्यावरून जाणाऱ्यांनी भुईज पोलिसांना अपघाताची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी कदम यांना सातारा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डोक्यातून जास्त प्रमाणात रक्तस्राव झाल्याने उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.