भाजपाचे सुरेश धस यांचा बीड-उस्मानाबाद-लातूर स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीत विजय झाला आहे. अशोक जगदाळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार यांचा पराभव केला आहे. ५२७ मतं मिळवणाऱ्या सुरेश धस यांनी ७८ मतांनी जगदाळे यांचा पराभव केला आहे. या विजयानंतर मुंडे भगिनींनीच वर्चस्व या भागावर अजूनही आहे हे समोर आले आहे.
आघाडी पुरस्कृत उमेदवार अशोक जगदाळे यांनी जोरदार लढाई दिली आहे. मात्र त्यांना आघाडीचे हक्काच्या मतांमध्ये फाटाफूट झाल्याने जगदाळे यांना पराभवाचा धक्का बसला आहे. पंकजा मुंडे यांच्यासाठी सुरेश धस यांचा विजय महत्वाचा मानला जात आहे. सुरेश धस यांना ५२६ मतं पडल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. तर अशोक जगदाळे ४५१ मतं पडली, २५ मतं बाद धरण्यात आली असून एक मत नोटाला देखील पडलं, मतमोजणीवर आक्षेप घेत राष्ट्रवादीकडून फेरमतमोजणीची मागणी करण्यात आली आहे.मात्र धस यांचा विजय यामुळे धनंजय मुंडे यांना जोरदार धक्का मानला जातो आहे. धनंजय मुंडे यांनी विजय व्हावा म्हणून प्रयत्न केले होते. मात्र दोन्ही कॉंग्रेस ने मते न दिल्याने हा पराभव झाला असे समोर येतय.