विचारधारेसाठी माझी लढाई सुरू राहणार आणि आम्ही ती जिंकू - राहुल गांधी

मंगळवार, 12 जून 2018 (14:57 IST)
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मानहानी प्रकरणी दाखल केलेल्या खटल्याची पुढील सुनावणी 10 ऑगस्टला होणार असून राहुल यांनी आरोप अमान्य असल्याचे सांगत राहुल गांधींनी आरोप फेटाळून लावले आहेत. तर राहुल गांधी म्हणाले की,  विचारधारेसाठी माझी लढाई सुरू राहणार आणि आम्ही ती जिंकू, त्यांनी सुनावणीनंतर भिवंडी न्यायालयाबाहेर पत्रकारांशी संवाद साधला आहे. आपल्या देशात शेतकरी, महागाई आणि बेरोजगारी या तिन्ही आघाड्यांवर हे सरकार फेल ठरले आहे अशी टीका राहुल यांनी केली. मात्र दुसरीकडे गांधी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहेत. राहुल यांनी 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भिवंडीतील एका जाहीर सभेत आरएसएसनं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या घडवून आणली होती, असे वादग्रस्त विधान केले. याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या मानहानीच्या खटल्यात भिवंडी न्यायालयाने आरोप निश्चित केले. आहेत. राहुल गांधींनी आरोप अमान्य केले आहेत. सुनावणीदरम्यान माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि अशोक गहलोत देखील उपस्थित होते. हा खटला पुढे सुरु राहणार असून त्यावर कोर्ट काय निर्णय देतय हे पाहण्यासारखे आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती