त्यांनी त्यांच्या शेतात विविध फळबागा फुलवल्या आहेत. त्यात त्यांनी बारमाही येणारा आंबा, संत्रा,सीताफळा, कमी उंचीचे नारळ, चिक्कू, स्ट्रॉबेरी, टरबूज अशी फळपीकांची लागवड करून त्या पासून उत्पादन घेत आहे.
दोन वर्षापूर्वी ठाकरे यांनी सफरचंदाचीही लागवड केली आहे.शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती व्यवसयात त्यांनी अमूलाग्र बदल केला आहे.त्यांची शेती ही कोरडवाहू भागातलीच शेती आहे. त्यांच्या शेतीजवळ ना कोणते धरणं आहे. ना कोणती मोठी नदी. मात्र उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर व उत्तम नियोजण आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर त्यांनी आपली 35 एकर शेती हिरवीगार केलीय.
पिकाला पाणी देण्यासाठी सम्पूर्ण ऑटोमेशन सिस्टीम बसवली आहे.ज्यामुळे बागेला हवं तेव्हडच पाणी, योग्य वेळी, मेंटेन करून दिलं जातं, याच नियोजनाद्वारे फळझाडांना खतंही दिली जातात. ज्यामुळे पाणी, खत आणि वेळीचीही बचत होत आहे.,