सोमय्या आपल्याच चपलेने स्वच:लाच मारणार : राउत

गुरूवार, 17 फेब्रुवारी 2022 (15:01 IST)
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला असून हजारो कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. किरीट सोमय्यांनी अमित शाह, फडणवीसांच्या नावे धमकावत गेल्या काही वर्षात साडे सात हजार कोटी जमा केलेत असा आरोप संजय राऊतांनी केली आहे. मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी किरीट सोमय्या आपल्याच चपलेने स्वच:लाच मारणार असून महाराष्ट्राचे लोक त्यांची कपडे काढून धिंड काढणार आहेत अशा शब्दांत टीका केली. तसंच त्यांना चोर आणि लफंगादेखील म्हटलं.
 
फडणवीसांच्या नावाने किरीट सोमय्यांनी शेकडो कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. पवई पेरूबाग जमीन प्रकरणी ४३३ बोगस लोकांना घुसवलं, प्रत्येकी २५ लाख रुपये किरीट सोमय्यांच्या दलालांनी घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या बोगस सह्या करत व त्यांच्या तसंच अमित शाह यांच्या नावाने किरीट सोमय्यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कोटी रुपयांची वसुली झाल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे. हा २०० ते ३०० कोटींचा घोटाळा असल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत. घोटाळ्याचे आपल्याकडे ट्रकभरुन पुरावे असल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती