‘एमपीएससी’कडून लघुलेखक परीक्षेचा निकाल जाहीर

गुरूवार, 22 जून 2023 (21:26 IST)
लोकसेवा आयोगाच्या वतीने विशिष्ट शैक्षणिक अर्हता आणि अनुभवाच्या आधारित घेण्यात आलेल्या चाळणी परीक्षांचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये उच्च श्रेणी लघुलेखक गट- ब अराजपत्रित, निम्न श्रेणी लघुलेखक गट- ब, लघुटंकलेखक गट-क पदांच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
 
२६ डिसेंबर २०२२ ला या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. अनेक महिन्यांपासून उमेदवारांकडून या परीक्षेच्या निकालाची विचारणा केली जात होती. या परीक्षेला लाखो उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यामुळे अनेकांकडून वारंवार निकालासाठी विचारणा केली जात होती. एमपीएससीने चाळणी परीक्षेचा निकाल जाहीर केला असून पात्र ठरलेल्या उमेदवारांची संगणक प्रणालीवर आधारित लघुलेखन टंकलेखनाची परीक्षा घेण्यात येणार आहे. लघुलेखक टंकलेखन चाचणीमध्ये पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती