भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास करण्यासाठी स्थापन केलेल्या आयोगाची मुदत गतवर्षी एप्रिल महिन्यात संपली होती. त्यानंतर त्याला मुदतवाढ मिळाली, मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्याचे काम ठप्प होते. आता 2 ऑगस्टपासून आयोगाचे कामकाज सुरू होत आहे. याप्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आपली साक्ष नोंदवणार आहेत.
न्यायमूर्ती जे. एन. पटेल हे कोरेगाव भिमा चौकशी आयोगाचे अध्यक्ष आहेत.शरद पवारांचीही साक्ष नोंदवली जाणार असल्याचं या अगोदरच सांगण्यात आलं होतं.आता, चौकशी आयोगाचे वकिल आशिष सातपुते यांनी 2 ऑगस्ट पासून साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात येत असल्याचे सांगितले आहे.
केंद्रीय तपास यंत्रणेने आनंद तेलतुंबडे, गौतम नवलखा,हनी बाबू, सागर गोरखे, रमेश गायचोर, ज्योती जगताप, स्टेन स्वामी आणि मिलिंद तेलतुंबडे यांच्यासह आठ जणांविरूद्ध आरोपपत्र दाखल केले आहे.