मुंबईत भरधाव कार दुभाजकाला धडकली, दोघांचा जागीच मृत्यू

बुधवार, 27 नोव्हेंबर 2024 (15:43 IST)
मुंबईच्या विलेपार्ले परिसरात भरधाव वेगाने जाणारी कार दुभाजकाला जाऊन धडकली या अपघातात दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व 18 वर्षाचे होते. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत एक्स्प्रेस हायवेवर वांद्रेहून गोरेगावला परतत असताना हा अपघात झाला 
मुंबईतील विले-पार्ले भागात वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर भरधाव वेगात असलेल्या दुभाजकावर कार आदळल्याने प्रथम वर्षाच्या दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाला.

विलेपार्ले पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सार्थक कौशिक (18) आणि जलज धीर (18) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. सार्थक हा पदवीच्याप्रथम वर्षात शिकत होता तर जलज धीर हा बीबीएचा विद्यार्थी होता. 
ALSO READ: पालघरमध्ये आरोग्य सुविधांच्या अभावामुळे, प्रसूती वेदनांनी त्रस्त महिलेचा रुग्णवाहिकेत मृत्यू
कार साहिल नावाचा तरुण चालवत होता. कार ताशी 120-150 किमी वेगाने धावत असल्याचे सांगितले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. विलेपार्ले येथील सर्व्हिस रोडवर जाण्याच्या प्रयत्नात कारचे नियंत्रण सुटले आणि दुभाजकावर जाऊन आदळली आणि अपघात घडला. जखमींना रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस पुढील तपास करत आहे. 
Edited By - Priya Dixit
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती