गोकुळ दूधाच्या विक्री दरात ४ रुपयांची वाढ

शनिवार, 16 एप्रिल 2022 (16:22 IST)
कोल्हापूर- गोकुळ दूध संघाने आज दूध विक्री दरात वाढ केली आहे. म्हैस दुधाच्या विक्री दरात प्रतिलिटर ४ रुपयांची दरवाढ केल्याची माहिती समोर येत आहे. आज त्याबाबत बैठकीत निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. वाढत्या महागाई सोबत वाढलेल्या इंधन दरवाढीमुळे हा निर्णय घेतला गेला आहे. असे आज झालेल्या संचालक आणि पदाधिकाऱ्या बैठकीत सांगण्यात आले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना प्रतिलिटर दुधामागे आता सुमारे ५८ रुपये मोजावे लागणार आहेत. शिवाय गृहणीचे बजेट कोलमडणार आहे.शनिवार पासून हे नवीन दर लागू होणार आहेत.

गोकुळच्या दूध विक्री दरात प्रति लिटर चार रुपये दरवाढ करण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. 54 रुपये प्रति लिटर असलेल्या गोकुळच्या दुधाचा दर आता 58 रुपये प्रति लिटर असा होणार आहे. शनिवार (दि. १६) पासून ही दरवाढ सर्वत्र लागू होणार आहे.

गोकुळ मध्ये सत्तांतर झाल्यानंतर शेतकर्‍यांकडून करण्यात येणाऱ्या दूध खरेदी दरात गोकुळने दोन वेळा प्रति प्रतिलिटर दोन रुपयांची दरवाढ दिली होती. मात्र यावेळी दूध विक्री दरात वाढ करण्यात आली नव्हती. त्याचबरोबर रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधनाचे दरही भरमसाठ वाढल्याने गोकुळच्या वाहतूक खर्चामध्ये ही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे शुक्रवारी झालेल्या बैठकीमध्ये दुधाच्या विक्री दरात प्रति लिटर चार रुपयांची दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. शनिवारपासून गोकुळ दुधाची प्रतिलिटर ५८ रुपये तर प्रति अर्धा लिटर एकोणतीस रुपयांप्रमाणे विक्री होणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती