नागपूरमध्ये राजकीय बॉम्ब फोडणार असे संजय राऊत यांनी केलेलं ट्विट चर्चेत

सोमवार, 26 डिसेंबर 2022 (16:39 IST)
हिवाळी अधिवेशवादरम्यान नागपूरमध्ये (Nagpur)राजकीय बॉम्ब फोडणार असल्याचं सांगत खळबळ उडवून दिली आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आज केलेलं ट्विट चांगलच चर्चेत आहे. दिशा सालियनप्रकरणी  सत्ताधाऱ्यांनी आदित्य ठाकरे  यांना टार्गेट केल्यानंतर ठाकरे गटही आक्रमक झाला आहे. संजय राऊत यांच्यासह ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे  आणि नेत्यांची फौजच नागपूरात दाखल झाले आहे. 
 
काय आहे संजय राऊत यांच्या ट्विटमध्ये 
संजय राऊत यांनी एक फोटो ट्वीट केला आहे. या फोटोत सुतळी बॉम्ब दाखवण्यात आला असून त्याला मोठी अगरबत्ती बांधण्यात आली आहे. या फोटोबरोबर जय महाराष्ट्र, शुभ प्रभात असं लिहिण्यात आलं आहे. नागपूरमध्ये राजकीय बॉम्ब फोडणार असल्याचं सांगितल्याने संजय राऊत यांच्या ट्वीटला महत्त्व प्राप्त झालं आहे. 
 
“महाराष्ट्रात कानडी भाषिकांवर मराठीचा अत्याचार झालेला नाही. बेळगाव निपाणी भागातल्या मराठी माणसावर भाषिक अत्याचार होत आहे. वीजबिलं असतील किंवा अन्य कागदपत्रांवर कन्नड भाषा असते. व्यवहार कानडी भाषेत होतात, मराठी माणसाला कानडी भाषा येत नाही. त्यामुळे त्यांना अंगठे उमटवायला लागतात. काही पिढ्यांना अंगठेबहाद्दर म्हटलं जातं असं माझ्या कानावर आलं आहे. सरकार निषेध करतं. कर्नाटक या निषेधाला काहीही किंमत देत नाही. एक इंचही जागा देणार नाही असा ठराव कर्नाटकने केला आहे. आम्हाला कर्नाटकची जागा नकोय, आम्हाला आमची हक्काची जागा हवी आहे. तीच आम्ही मागतो आहोत. त्याव्यतिरिक्त आम्ही वेगळं काही मागत नाहीयोत”,असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
Edited by : Smita Joshi 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती