राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केलेल्या टीकेला प्रत्त्युतर दिले आहे. तीन-साडेतीन महिने आराम केल्यामुळे त्यांचं थोडसं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे, त्याच्यावर उपचाराची गरज आहे. असं ते म्हणाले आहेत.
संजय राऊतांनी केलेल्या टीकेवर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना शंभूराज देसाई म्हणाले, “रोज नवा मुद्दा काढला जातो, सुरुवात एका मुद्य्यावर करतात, भरकटत तिसरीकडे जातात. त्यामुळे मला असं वाटतंय तीन-साडेतीन महिने आराम केल्यामुळे त्यांचं थोडसं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. त्यांच्यावर उपाचाराची गरज आहे, जेणेकडून अशाप्रकारे बेताल बडबड करण्याचं राऊत थांबवतील. प्रसारमाध्यमंच त्यांना महत्त्व देतात, आम्ही त्यांच्या बेताल वक्तव्यांना महत्त्व देत नाहीत असे सांगितले.