तर संभाजीराजे छत्रपती यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा

गुरूवार, 27 मे 2021 (16:05 IST)
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीही भेटायला तयार नसतील तर संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा, असे वक्तव्य माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केले. राज्यात दौरे करुन किंवा आंदोलन करुन मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही, असेही जाधव यांनी म्हटले. 
 
ते गुरुवारी औरंगाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी हर्षवर्धन जाधव यांनी मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे यांनी आणखी आक्रमक भूमिका घ्यावी, असे सुचविले. छत्रपती संभाजी राजेंनी भाजपच्या मदतीने संसदेत प्रस्ताव आणून मराठा आरक्षणाचा कायदा करावा. जर भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी संभाजी राजे यांचे ऐकत नसतील, भेटत नसतील तर त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा, असे हर्षवर्धन जाधव यांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती