गुलाब चक्रीवादळाचा राज्यात जोर असण्याची शक्यता,अनेक जिल्ह्याना ऑरेंज अलर्ट जारी

रविवार, 26 सप्टेंबर 2021 (11:50 IST)
बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचे क्षेत्र शनिवारी ' गुलाब ' चक्रीवादळामध्ये बदलले .आयएमडीच्या विभागानुसार,चक्रीवादळ पश्चिमेकडे सरकण्याची आणि रविवारी संध्याकाळी उत्तर आंध्र प्रदेशातील कलिंगपट्टणा आणि दक्षिण ओडिशामधील गोपालपूर किनारपट्टीच्या दरम्यान जाण्याची शक्यता आहे.गुलाब चक्रीवादळ हे बंगालच्या उपसागरात दाखल झाल्यामुळे राज्यात चारदिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.या पूर्वी तौक्ते वादळाचा फटका राज्याने बघितलाच आहे. आता या नवीन नैसर्गिक आपत्ती गुलाबी चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर काय परिणाम होईल हे जाणून घेणं महत्त्वाचे आहे.
 
सध्या भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार, बंगालच्या उपसागराच्या उत्तर आणि मध्य भागांवर खोलवर आलेली दाब 14 किमी प्रतितास वेगाने पश्चिमेकडे सरकली आहे.आयएमडीने म्हटले आहे, "26 सप्टेंबर संध्याकाळपर्यंत कलिंगपट्टणमच्या आसपास विशाखापट्टणम आणि गोपालपूर दरम्यान उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशा किनारपट्टीकडे जाण्याची शक्यता आहे." 
 चक्रीवादळाच्या प्रभावामुळे वाऱ्याचा वेग 95 किलोमीटर प्रतितासापर्यंत असण्याची शक्यता आहे.
 
रविवारपासून पुन्हा मुंबई समवेत महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे पुढील 12 तासात हे चक्रीवादळाचे रूप घेणार.या मुळे विदर्भ,मराठवाडा मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.याचा परिणाम कोंकण आणि मुंबईत दिसणार.पावसाचा हा जोर 26 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर पर्यंत असणार.
 
येत्या 4 -5 दिवस मेघगर्जनेसह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस येण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.विशेषत:रविवारपासून पावसाचा जोर वाढेल.त्याचा परिणाम विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात जास्तीत जास्त असेल.त्याचा परिणाम कोकण आणि मुंबईतही दिसून येईल.
 
अशी शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे.कोकण,गोवा,मराठवाडा,मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात 27 सप्टेंबर रोजी ऑरेंज अलर्ट जारी केले आहे.नंदुरबार,धुळे,जळगाव,रायगड,रत्नागिरी जिल्ह्याला 28 सप्टेंबर रोजी ऑरेंज अलर्ट सांगण्यात आले आहे. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती