मुंबईकरांना ‘एरंगळ जत्रे’साठी बेस्टकडून दिलासा, ६६ जादा बस सोडणार

शुक्रवार, 6 जानेवारी 2023 (08:05 IST)
८ जानेवारी रोजी ‘एरंगळ जत्रे’ ला सुरुवात होणार आहे. या यात्रेला जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट परिवहनतर्फे मालाड स्थानक (पश्चिम) ते एरंगळ आणि मार्वे बीच ते मढ जेट्टी, मार्वे बीच ते एरंगळ दरम्यान बसमार्ग क्र. २७१, तसेच बोरीवली बसस्थानक (प.) ते मढ जेट्टी दरम्यान बसमार्ग क्र. २६९ अशा एकूण सकाळी २२ आणि संध्याकाळी ४२ बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. या जादा बसगाड्या सकाळी ६ पासून चालविण्यात येणार आहेत. तसेच, या बस सेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद लाभल्यास आवश्यकतेनुसार जादा बसगाड्या सोडण्याची व्यवस्था देखील करण्यात येईल, अशी माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली आहे.
 
सदर बसगाड्यांमधून प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांच्या मदतीसाठी मालाड स्थानक (पश्चिम), मार्वे बीच, मढ जेट्टी, एरंगळ, भाटी व्हिलेज मालवणी आगार इत्यादी ठिकाणी वा
तूक अधिकारी आणि सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे. बस निरीक्षक व सुरक्षा अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाच्या जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली.
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती